Kothrud : मोबाईल शॉपीमधून 52 लाखांचे 200 मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यातील मोबाईल शॉपीमधून (Kothrud) तब्बल 52 लाखांचे 200 मोबाईल लंपास करण्यात आले आहे. ही घटना कोथरूड भागात घडली असून सोबत चोरांनी 1 लाख साठ हजारांची रोकड चोरी केली आहे. 

ही घटना 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. याबाबत दुकानाचे मालक गौरव सुरेश शिंदे (वय 31, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या डहाणूकर कॉलनीमधील कलाकृती हौसिंग सोसायटीत गौरव शिंदे यांचे मोबाईलचे दुकान आहे.

Lashkar Crime : धमकावून वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक

शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे (Kothrud) कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 200 मोबाईल आणि रोकड चोरी केली. या घटनेची माहिती कळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.