Lashkar Crime : धमकावून वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक

एमपीसी न्यूज – लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ ( Lashkar Crime) विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

निलेश दशरथ कणसे (वय 39, रा. जान महंमद स्ट्रीट, लष्कर), अविनाश राजेंद्र पंडित (वय 32, रा. शिंपी आळी, महात्मा गांधी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश पाटणे (वय 37, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणे यांचे लष्कर भागात चहा विक्रीचे दुकान आहे. कणसे, पंडित वर्गणीसाठी दुकानात आले होते. पाटणे यांनी त्यांना 151 रुपये दिले.

Ganeshotsav : विसर्जन मिरवणूकीत वीजेपासून सावधान; महावितरणचे गणेशभक्तांना आवाहन

त्यानंतर कणसे आणि पंडित यांनी त्यांच्याकडे एक हजार ( Lashkar Crime) रुपये मागितले. पाटणे यांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली. पाटणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कणसे आणि पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.