Pune : वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत पुरवठ्याचा बिघाड झाल्याने दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळित

एमपीसी न्यूज –  वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात महावितरणकडून विद्युत ( Pune ) पुरवठ्यात बिघाड झाल्याने सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा, वडगाव यासह दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळित झाला. ठरलेल्या वेळाला पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात शनिवारी (दि. 23) सकाळी साडे सहाच्या सुमारास ( Pune ) महावितरणच्या केयॉस पॅनलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद पडली. महापालिकेने महावितरणला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरु झाले. दुपारी अडीचच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.

 

दरम्यान ही घटना सकाळी घडली असली तरी नागरिकांना पाणी पुरवठा होणार नाही याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. ठरलेल्या वेळेला पाणी न आल्याने नागरिकांनी चौकशी सुरु केली. त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणी येणार नसल्याचे महापालिकेतर्फे स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

 

जलकेंद्रातील यंत्रणा ठप्प झाल्याने त्याचा फटका राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, वडगाव, धायरी, कात्रज, आंबेगाव, सहकारनगर, कात्रज कोंढवा रस्ता, कोंढवा, बिबवेवाडीच्या काही भागाला बसला. पाणी येणार नसल्याचे समजल्यानंतर सोसायट्यांनी खासगी टँकर मागविण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी महापालिकेतर्फे मोफत टँकर ( Pune ) पुरवले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.