Wakad : डेटिंग ॲप वरून ओळख झालेल्या मित्राने लग्नाच्या आमिषाने केला लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – डेटिंग ॲप वरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष ( Wakad) दाखवले. त्यातून तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. तरुणी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. तसेच तिच्याशी लग्न न करता भांडण केले. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2023 ते मार्च 2024 या कालावधीत घडला.
तेजस विनोद दसपुते (वय 27, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जून 2023 मध्ये फिर्यादी तरुणी आणि आरोपी तेजस यांची बंबल या डेटिंग ॲप वरून ओळख झाली. तिथे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तेजसने तरुणीला हिंजवडी मधील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. मात्र त्याने लग्नाचे आश्वासन दिल्याने तरुणीने याबाबत वाच्यता केली नाही.

त्यानंतर तेजसने तरुणीच्या घरी जाऊन तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवले. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. तेजसने तिचा गर्भपात केला. त्याने तरुणीकडून वारंवार सुमारे साडेचार लाख रुपये घेतले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने वेगवेगळी कारणे दिली. दरम्यान तरुणी तेजसच्या नाशिक येथील मूळ गावी जाऊन आली. तिथे तेजसच्या कुटुंबीयांशी बोलून याबाबत तोडगा काढण्याची तिने विनंती केली. मात्र तेजसला विचारून आपण कळवू असे त्याच्या आईवडिलांनी सांगितले.
यावरून तेजसने फिर्यादी तरुणीच्या भावाला धमकी दिली. त्यानंतर ही तेजसने लग्नाचे आश्वासन देऊन वारंवार लैंगिक संबंध ठेवले. फिर्यादी तरुणी आजारी असताना तिच्याशी भांडण केले. तरुणीच्या काही वस्तू त्याने जाळून टाकल्या. त्याने लग्नासाठी नकार दिला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्रचे सचिव आणि पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप नाईक ( Wakad) व सामाजिक कार्यकर्ते अक्षय कारके यांनी पाठपुरावा केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.