Loksabha Election 2024 : जिल्हास्तरीय माध्यम कक्ष व माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वित

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या ( Loksabha Election 2024 ) अध्यक्षतेखाली माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे.‍

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम कक्ष (मीडिया सेल) हा ए-विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 020- 29996065 असा आहे. या ठिकाणाहून माध्यमांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. समाज माध्यमांवरील निवडणूक विषयक आचारसंहिता भंग किंवा आक्षेपार्ह मजकुरावरही या कक्षामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.

Metro News : धुळवडीनिमित्त मेट्रो सेवा दुपारी दोन पर्यंत बंद

माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक 020-26121307 असा आहे. या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणीत करण्यासंबंधीची कार्यवाही केली जाणार आहे. समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात ( Loksabha Election 2024 ) येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.