Pune : महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांसाठी पुणे परिमंडलात ‘स्वागत सेल’ कार्यान्वित

एमपीसी न्यूज – महावितरणच्या सर्व औद्योगिक (Pune) ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत रास्तापेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडलस्तरावर स्वतंत्र ‘स्वागत सेल’ कार्यान्वित करण्यात आले. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते या सेलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती.

रास्तापेठ येथे ‘प्रकाशदूत’ सभागृहात गुरुवारी (दि. 11) आयोजित कार्यक्रमात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक, औद्योगिक संघटना प्रतिनिधी यांच्यात संवाद कार्यक्रम झाला. यावेळी ‘स्वागत सेल’बाबत सादरीकरणातून सविस्तर माहिती देण्यात आली. ‘तत्पर ग्राहकसेवा व पायाभूत वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरणामुळे औद्योगिक ग्राहकांमध्ये महावितरणबाबत विश्वासार्हता वाढीस लागली आहे. पूर्वीपेक्षा वरिष्ठ पातळीवर खुला संवाद व संपर्क वाढला आहे. तात्काळ उपाययोजनांमुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. या तीनही ‘स्वागत सेल’मुळे ग्राहकसेवेचे आणखी तत्पर व्यासपीठाचे स्वागत आहे,’ असे प्रातिनिधिक मनोगत उद्योजक व औद्योगिक प्रतिनिधींनी व्यक्त केले.

Pune : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – चंद्रकांत पाटील

प्रादेशिक संचालक अंकुश नाळे म्हणाले, ‘महावितरणच्या महसूलाचा औद्योगिक ग्राहक प्रमुख स्त्रोत आहे. ‘स्वागत सेल’मुळे औद्योगिक ग्राहकांना वीजसेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट मंडलस्तरावर संपर्क साधता (Pune) येईल. स्थानिक कार्यालयांच्या औद्योगिक ग्राहकसेवांसाठी या सेलकडून समन्वय व दैनंदिन देखरेख राहणार आहे.’ यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, ‘पुणे परिमंडलामध्ये एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेतून ४५ कोटींच्या पायाभूत वीजयंत्रणेची विविध कामे वेगाने सुरू आहेत. सोबतच औद्योगिक ग्राहकांसाठी आणखी 100 कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजूरीनंतर त्यातील सर्व कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दर्जेदार वीजपुरवठा व तत्पर ग्राहकसेवामध्ये कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही’, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अमित कुलकर्णी तसेच उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधी सर्वश्री दिलीप बटवाल, नरेश राठी, शांताराम जाधव, संदीप बेलसरे, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, प्रशांत खानखोजे, राम जोगदंड आदींसह महावितरणचे अभियंता, अधिकारी उपस्थित होते. ‘स्वागत सेल’चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता व वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) काम पाहतील. त्यांना ८ ते १० अभियंता व कर्मचारी सहकार्य करतील. या सेलकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जावून कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.