Pune : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ माँसाहेब (Pune) आणि स्वामी विवेकानंद या दोघांनीही लढण्याची प्रेरणा दिली आणि आज त्यांच्या जयंती दिनी समोर बसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे बघून ही शिकवण या मुलांनी अंगीकरल्याचे दिसून येते, असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. आपल्या शरीरात काहीतरी व्यंग आहे त्याच्यावर मात करून जिद्दीने जगणाऱ्या या विद्यार्थ्यांना सलाम करतानाच त्यांना मदत करणाऱ्या क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप सारख्या संस्थांचे ही मी अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असेही पाटील यांनी सांगितले.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने वानवडीतील दिव्यांग कल्याणकारी केंद्र आणि संशोधन संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी तब्ब्ल 120 बेंच भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन अध्यक्ष संदीप खर्डेकर, फिनोलेक्सचे प्रदीप विदुला (अध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग), ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी, आमदार सुनील कांबळे, मुकुलमाधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, फिनोलेक्सचे पृथ्वीराज भागवत काळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे, मुख्याध्यापक शिवानी सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Bhosari : एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वृद्धास बेदम मारहाण

आहे रे आणि नाही रे यांच्या मधील जे अंतर आहे / दरी आहे त्यावरील सेतूचे काम क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन करत असते आणि अनेक कंपन्याचे सी एस आर निधी हे योग्य ठिकाणी पोहोचावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, असे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. दिव्यांगांना सहानुभूतीची नाही तर मदतीचा हात आणि साथ देण्याची गरज असून त्या आधारावर ते सक्षमपणे समाजात उभे राहू शकतात आणि सामान्य माणसाप्रमाणे समाजात जगू शकतात असेही खर्डेकर (Pune) यांनी निक्षून सांगितले.

मुकुलमाधव फाउंडेशन, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप हातात हात घालून समाजासाठी काम करतात आणि जेथे जेथे गरज आहे तेथे मदतीचा हात देऊन समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण करत असतात, असे प्रदीप विदुला आणि मनोज हिंगोरानी यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले.

संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून त्यांना सक्षम करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत असते. सर्व विषय हे समाजातील दानशूरांवर अवलंबून असते असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली आहे, त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून मुरलीधर कचरे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले, प्रदीपदादा रावत यांनी उपस्थितांचे स्वागत तर मुरलीधर कचरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. दिव्यांग मुलांनी विविध वेशभूषेत स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.