Pune : जुन्नर तहसीलदारावर कारवाई व्हावी म्हणून चक्क उड्डाणपूलावर चढून युवकाचे आंदोलन

एमपीसी न्यूज : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Pune) तहसीलदारावर कारवाई व्हावी यासाठी चक्क एका युवकाने CEOP या उड्डाणपुलावर चढून आंदोलन केले आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरीही हा युवक खाली उतरायला तयार नाही.
जुन्नर तहसीलदारावर कारवाई व्हावी, यासाठी हा युवक उड्डाणपूलावर चढला आहे. तो खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली आहे.
शेतकर्यांचे प्रश्न जुन्नर येथील तहसीलदार सोडवित नाही. त्या प्रश्नावर महेंद्र नावाचा तरुण मागील तासभरा पासून संचेती पुला जवळ असलेल्या पुलावर चढून जुन्नर येथील तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे. ही मागणी करीत असून हातामध्ये बॅनर घेऊन कठड्यावर बसला आहे.
पोलिस आणि अग्निशामक विभागाचे अधिकारी खाली येण्याची विनंती करित आहे. पण तो तरुण जुन्नर येथील तहसीलदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीवर ठाम आहे. तर घटनास्थळी बघ्यांची गर्दी प्रचंड झाली असून यामुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर झाली आहे.