Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा भागात (Pune) राहणार्‍या एका पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरती विकास झा (वय 26 रा कोंढवा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, रणजीत उर्फ विकास झा असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती रणजीत उर्फ विकास झा आणि मयत आरती विकास झा हे कोंढवा भागातील पिसोळी येथील पद्मावती हाईटस इमारतीमधील फ्लॅट क्रमांक 502 मध्ये राहण्यास होते. आरोपी रणजीत उर्फ विकास झा हा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा.

Pune : जुन्नर तहसीलदारावर कारवाई व्हावी म्हणून चक्क उड्डाणपूलावर चढून युवकाचे आंदोलन

यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. काल देखील दोघांमध्ये (Pune) वाद झाला होता. त्यानंतर आरोपी रणजीत याने पत्नी झोपल्यानंतर तिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आरोपी रणजीत उर्फ विकास झा हा घटनास्थळावरून पसार झाला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.