BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कला क्षेत्रात कामगिरी करणा-या युवतींचा ‘युवती कला महोत्सव आणि सन्मान’

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 आणि नृत्यकला मंदिर यांचे आयोजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 आणि नृत्यकला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कला क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणा-या युवतींचा गुणगौरव करणारा ‘युवती कला महोत्सव आणि सन्मान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आजच्या युवती भविष्यातील सक्षम महिला असणार आहेत, त्यासाठी युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मनोहर सभागृहात शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. गायिका अभिनेत्री सायली राजहंस, पखवाज वादक अनुजा बोरुडे, नृत्य टीव्ही कलाकार ऋतुजा जुन्नरकर यांचा सन्मान होणार आहे. तसेच त्यांच्या कलाविष्कारांचा अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे.

  • कार्यक्रमासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ला रमेश शाह, उपप्रांतपाल ला ओमप्रकाश पेठे, ला अभय शास्त्री, ला हेमंत नाईक, आनंद मुथा, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

भारतात चार महिला पखवाज वादक आहेत. त्यात अनुजा बोरुडे ही एक आहे. ती पखवाज वादन सादर करणार आहे. अभिनेत्री गायिका सायली राजहंस हिने नाट्यसंगीताचा लोप पावत चाललेला कलाविष्कार जपला आहे. ती नाट्यसंगीतातील पदे व अभंग सादर करणार आहे. ऋतुजा जुन्नरकर हिने वेगवेगळ्या टीव्ही कार्यक्रमांमधून सहभाग घेतला आहे. तिने भरतनाट्यम मधील अलंकार ही पदवी घेतली आहे.

  • कला क्षेत्राला या युवतींनी एका विशिष्ट उंचीवर नेले आहे. त्यासाठी त्यांची या कार्यक्रमात निवड करण्यात आली आहे. लायन्स डिस्ट्रिक्टच्या युवा विभागाच्या प्रांतीय अधिकारी तेजश्री अडीगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
HB_POST_END_FTR-A2

.