Pimpri : भाजयुमोतर्फे वारकऱ्यांना रेनकोट, बिस्किट, पाणी, लाडू वाटप

एमपीसी न्यूज – भाजयुमोतर्फे वारक-यांना रेनकोट, बिस्किट, पाणी आणि लाडू वाटप करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पायी जाणा-या वारकऱ्यांना शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली भाजयुमोतर्फे मॅग्झीन चौक, भोसरी आणि खराळवाडी येथे रेनकोट, बिस्किट, पाणी, केळी, लाडू ई. वाटप करण्यात आले व त्यानंतर ‘स्वच्छ भारत अभियान’ साठी खारीचा वाटा म्हणून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा प्रसार करण्यात आले. 

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा प्रदेश चिटणीस उमा खापरे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रभाग स्वीकृत समिती सदस्य विठ्ठल भोईर, वैशाली खाड्ये, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, भाजयुमो पदाधिकारी अजित कुलथे, अमित गुप्ता, सचिन राऊत, अजय भोसले, मंगेश धाडगे, दीपक नागरगोजे, पंकज शर्मा, मधुकर बच्चे, भूषण पाटील, पंकज वेंगुर्लेकर, राहुल शिंदे, सोनल वर्मा, सुमित घाटे, पराग जोशी, गणेश संभेराव, पंकज वेंगुर्लेकर, महेश कंद, गोपाल मंडल, ऋतिक चव्हाण, अमित देशमुख, सत्पाल गोयल, इंद्रमल कुसवाह, शरद फुगे, संग्राम गुळवे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.