Lonavala : अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोलनाका या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  

 
मयत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, नेसनिस फूल बाहयाचा पांढरे रंगाचा शर्ट त्यावर लाल रंगाचे टिपके, निळे रंगाचा हाफ बरमुडा त्यावर युएसए या देशाचा राष्ट्रध्वजाचा चिन्ह आहे. अपघातात डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर भादंवी कलम 304 (2), 279, 337, 338, मो. वा. का.क. 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रनसौरे हे करीत आहेत. तरी सदर इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला 02114 273036 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.