Pune : विदर्भाचे वेगळे राज्य वढू, रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

एमपीसी न्यूज – बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य पाहिजे पण ते वढू, रायगडाला मान्य नसल्याचे सांगत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी वादात उडी घेतली आहे. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात ते धारक-यांसमोर बोलत होते. 

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सालाबादप्रमाणे यावर्षीही संचेती हॉस्पिटल पूल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यँत धारकऱ्यासह सहभागी होणार आहेत. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे गुरुजी यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

भिडे गुरुजी म्हणाले, मनुष्य हा मनाला जिंकू शकत नाही. मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार आहे. ते साध्य कसे होईल याची शिकवण संतांनी आपणास दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळाली पाहिजे. यासाठीच रायगडावर सोन्याचे सिंहासन साकारले जाणार आहे. याकामी राज्यातील तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.