Ravet : अतिक्रमण करत जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : खोटे दस्तऐवज बनवून (Ravet) जमिनीवर अतिक्रमण करत जमिन बळकावल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 मे 2022 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत रावेत येथील सर्वे क्रमांक 75/ 2 अ येथे घडला आहे.

महिलेने रावेत पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.28) फिर्याद दिली असून सुनिलकुमार विनोदभाई पटेल, राजेशकुमार विनोदभाई पटेल, नरेशकुमार रवजीभाई पटेल, सतीशकुमार रवजीभाई पटेल, अल्पेश अरविंदभाई पटेल यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Kalewadi : नारायण अभ्यंकर यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची रावेत येथील सर्वे नंबर 75/2 अ येथे 2 गुंठे जमीन असून खरेदी दस्त मधील दस्त जाणीपूर्वक खोटे बनवून फिर्यादीच्या प्लॉटवरील सिमेंटचे खांब चोरून नेले व पत्र्याचे कंपाऊड मारून फिर्यादीची दोन गुंठ्याचा 50 लाख रुपयांची जमीन हडपली आहे.

याची विचारणा केली असता प्लॉटवर पाऊल ठेवले तर गाडून टाकू किंवा खंडणीसारखे गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.