Alandi News : आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावरील रहदारीमुळे युवतीच्या उपचारास विलंब; युवतीचा वाटेतच मृत्यू

एमपीसी न्यूज : आळंदी येथे रविवारी 5 मार्च रोजी सायंकाळी एका रुग्णवाहिकेतून एक रुग्ण आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्या रुग्णवाहिकेल (Alandi News) आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय पर्यंतच्या प्रवासास तेथील रहदारी मुळे अडथळा निर्माण झाला. परिणामी रूग्णावरील उपचारासाठी विलंब झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पोहचण्या अगोदरच एका 21 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला. रविवारी (पाच मार्च) संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

उज्ज्वला नामदेव झाडे (वय 21 वर्षे)ही युवती तिच्या घराच्या गॅलरी मधून आंब्याच्या झाडावरील आंबे काढत असताना तिचा तोल जाऊन ती जमिनीवर खाली पडली व तिला गंभीर स्वरूपाची डोक्याला ईजा होऊन तिचे डोके फुटून डोक्यातील रक्त बाहेर वाहत होते. ती परिस्थिती पाहता तत्काळ रुग्णवाहिकेतून या यूवतीला रुगणालयाच्या दिशेने नेण्यात आले. काही काळ तिचा श्वास सुरू होता. मात्र प्राथमिक उपचार वेळेवर नं मिळाल्याने या तरूणीला आपला जीव गमवावा लागला.  अशी माहिती डॉक्टरांना रुग्णवाहिकेत बसलेल्या मुलांनी व इतर व्यक्तींनी दिली.

रुग्णवाहिकेतून त्या युवतीला ग्रामीण रुग्णालयात आणत असताना आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावर दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली दुचाकी वाहने, (Alandi News) हातगाड्या,दुतर्फा भाजी विक्रेते व इतर विक्रेते इ.रहदारीतील अडथळ्यांमुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेला पोहचण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा विलंब झाला असल्याची माहिती डॉ. शुभांगी नरवाडे यांनी दिली.

Chinchwad News : डिफेन्स फोर्स लीग एक्स आर्मीमेन संस्थेच्या वतीने पोलीसांचा गौरव

युवतीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने व डोक्यातील रक्त बाहेर वाहिल्याने तिला रुग्णालयात आण्या अगोदरच वाटेतच तिचा मृत्यू झाला. हे रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तींसमोर त्यांनी जाहीर केले. रात्री वाय सी एम हॉस्पिटल कडे पोस्टमार्टम साठी मृतदेह पाठवण्यात आला.(Alandi News) रुग्णवाहिकेतील मुलांच्या व इतर व्यक्तींच्या माहिती नुसार आळंदी पोलीस स्टेशन जवळील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या चौका पर्यंत त्या युवतीचा श्वास रुग्णवाहिकेत चालू होता.

येथून फक्त अर्धा एक मिनटाच्या अंतरावर असणाऱ्या किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागणाऱ्या रस्त्यावर तेथील बेकायदेशीर दुतर्फा दुचाकी पार्किंग वाहने,दुतर्फा भाजी विक्रेते,हातगाड्या  इ.विक्रेत्यां मुळे व त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रचंड रहदारी अडथळ्या मुळे 20 ते 25 मिनटांचा ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी उशीर झाला.

संबधीत माहितीद्वारे ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, तेथील रहदारी अडथळ्यांमुळे रुग्णवाहिकेस ग्रामीण रुग्णालयात पोहचण्यासाठी विलंब झाला. तो जर झाला नसता तर तिला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार मिळाले असतेव तिचा जीव वाचला असता. पुढे तिला तत्काळ उपचारासाठी पाठवले गेले असते.परंतु रुग्णालया मध्ये येण्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य फाटक पर्यँत रस्त्यावर भाजी विक्रेते ,फळ विक्रेते, फेरीवाले बसल्यास तसेच सदर ठिकाणी कोणी वाहने लावल्यास कायदेशीर (Alandi News) कारवाई करून गुन्हा दाखल करणेत येईल असा आदेश मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या कार्यकालात काढून तसेच फलक तिथे बसवण्यात आले होते. परंतु ते आदेश धुडकावून दुतर्फा भाजी विक्रेते इतर विक्रेते तेथे बसत आहेत व बेकायदेशीर वाहने लागत आहेत. त्या संबंधित सविस्तर वृत्त ही एम पी सी न्यूज ने 20 जानेवारी 2023 मध्ये रोजी प्रसारित केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.