Saibaba Charitable Trust: साईबाबा चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त शेख यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

एमपीसी न्यूज – शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरगाव साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त उस्मान दगडू शेख यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख यांनी या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयात अटक पुर्व जामीनासाठी अर्ज केला होता जो 24 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने फेटाळला आहे.

शिरगाव येथील शेतकरी लिंबाजी रामभाऊ गायकवाड (वय 56, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार उस्मान दगडू शेख (रा. शिरगाव, ता. मावळ), समीर शिरील मुनतोडे (रा. वडगाव शेरी, पुणे), अशोक लक्ष्मण कांबळे (रा. कांबरे, ता. मावळ), जहांगीर राजू डांगे (रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी शिरगाव येथील गट नंबर 197 यापैकी 50 आर ही फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्या जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी फिर्यादी हे आरोपी उस्मान याच्या घरी गेले असता उस्मान याने फिर्यादी यांना ‘जमिनीबाबत काय विचारतो, ती जमीन माझी आहे’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

Pune News : ‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

‘माझा मुलगा पोलीस पाटील आहे. पोलिसात तक्रार दिली तर तुला या गावातून गायब करून जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. 2 फेब्रुवारी 2022 पूर्वी आरोपींनी सदर जमिनीचे बनावट खरेदी पावती करून त्यामध्ये फिर्यादी यांच्या नावाची बनावट सही केली. फिर्यादी यांची वडिलोपार्जित मिळकत हडपण्याचा, लुबाडण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. तसेच न्यायालयास फसवण्याच्या उद्देशाने खोटी खरेदी पावती तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

पोलीस कारवाईनंतर शेख यांनी न्यायालयात धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाने अटक पुर्व जामीन फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.