pune news: दिपावलीनिमित्त बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन

एमपीसी न्यूज : दिपावलीनिमित्त जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ साहित्य, आकाश कंदील, पणत्या, घरगुती उटणे आदी उत्पादनांच्या विक्रीचे प्रदर्शन १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

नवीन जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय व मध्यवर्ती इमारत पुणे येथे हे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून नागरिकांना या प्रदर्शनास भेट देऊन खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.