Diwali Shopping : मध्यवर्ती भागात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी

एमपीसी न्यूज – दिवाळी खरेदीसाठी मध्यवर्ती भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार, रविवार, सोमवारी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. 
खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग, कुमठेकर रस्ता, शनिपार परिसरात रस्त्यावर चारचाकी वाहने लावण्यात आली होती. सोमवारी नरकचतुर्दशीच्या दिवशी नवीन कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत हजारो पुणेकर रस्त्यांवर आले होते. त्यामुळे चालणेही अवघड झाले होते.

गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली. दुसरीकडे वाहतूक कोंडी सोडविता सोडविता पोलिसांची दमछाक झाली. कोथरूड, कर्वेनगर,  वारजे – माळवाडी, बाणेर, बालेवाडी, बावधन, स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर, हडपसर उपनगरांतील नागरिक मध्यवर्ती भागांत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षांनी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाल्याचे कपडे विक्रेते राजेश अग्रवाल यांनी सांगितले. दिवाळीनिमित्ताने ज्वेलरी दुकाने सजली आहेत. नागरिकांना विविध आकर्षक ऑफर्स दिलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.