Women Police felicited : उल्लेखनिय कामगिरीबद्दल आठ महिला पोलिसांचा स्मार्ट ई-बाईक देऊन गौरव

एमपीसी न्यूज – द्रुव गृप व टाईम्स गृप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल 8 महिला पोलीस अमलदार (Women Police felicited) यांना ई बाईक चे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम सोमवारी (दि.17) निगडी मुख्यालय येथे पार पडला.बाईक चे वाटप पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपायुक्त मुख्यालय काकासाहेब डोळे, (Women Police felicited) सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन सतीश माने, जनसंपर्क अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव तसेच द्रुव सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रतनदीप रे  व संपूर्ण टीम मान्यवर होते.

Pimpri News : सांस्कृतिक चळवळीसाठी एकत्र यावे- डॉ. प्रवीण भोळे

पुढील आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.

1) एम. आर. गायकवाड (महिला सहायक पोलीस फौजदार) नेमणूक निगडी पोलीस

ठाणे यांनी उत्कृष्ठ तपास व एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत 1 लाख 40 हजार 566 रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

2) सुवर्णा उरकर (महिला सहायक पोलीस फौजदार ) नेमणूक भोसरी वाहतुक विभाग यांनी उत्कृष्ठ वाहतूक नियोजन व नियमन करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

3)ए. पी. बोरकर (महिला पोलीस हवालदार) नेमणूक भोसरी पोलीस ठाणे यांनी कोव्हीड 19 च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

4)  तनुजा चौधरी (महिला पोलीस हवालदार) नेमणूक वाकड पोलीस ठाणे यांनी सी. सी. टी. एन. एस. या कार्यप्रणालीवर सर्व गुन्ह्यांची माहिती वेळेत अद्ययावत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

5) शालिनी वचकल (महिला पोलीस हवालदार) नेमणूक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी जनतेशी सौहार्दपुर्ण जनसंवाद आणि मिसींग व्यक्ती तसेच महिला विषयक तक्रारीचे निरसन करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

6). सुरेखा देशमुख (महिला पोलीस हवालदार) नेमणूक मुख्यालय यांनी कोव्हीड 19 च्या कालावधीत जीवाची पर्वा न करता उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

7) कविता घोडगे (महिला पोलीस नाईक) नेमणूक देहुरोड पोलीस ठाणे यांनी सन 2022 मधील जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये गर्दीचा फायदा घेवून पाकीट चोरी करणारे व चैन चोरी करणारे आरोपी निष्पन्न करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

8) कांचन पंडीत (महिला पोलीस नाईक) नेमणूक दिघी पोलीस ठाणे यांनी सन 2022 मधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी बंदोबस्ताचे उत्कृष्ठ नियोजन तसेच पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणे संपुर्ण निर्गती करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

दुव गृप व टाईम्स गृप यांनी महिला पोलीसांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेवून त्यांना स्मार्ट ई-बाईक देवुन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल आयोजकांचे व संपूर्ण टीमचे (Women Police felicited) आयुक्त अंकुश शिंदे यांनी आभार व्यक्त करून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या सर्व महिला पोलीस अंमलदारांना  समाजामध्ये अधिक उत्कृष्ठ कर्तव्य बजावून पोलीस दलाचे नाव उज्वल करावे असे  मार्गदर्शन करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.