Saswad Crime News : काळभैरवनाथ मंदिरात बकऱ्याचा बळी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : काळभैरवनाथाचा मंदिरामध्ये एकत्र जमून बकऱ्याचा बळी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सोमर्डी गावात 25 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.

सुनील पवार, भानुदास भोराडे, विजय भोराडे, सीताराम भोराडे, विजय भोराडे, सुरेश भोराडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेलयांची नावे आहेत. याप्रकरणी रामदास देवबा भोराडे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मंदिरात एकत्र जमून बकर्‍याचा बळी दिला. त्यांनतर यातील मांसाचे तुकडे आपापसात वाटून घेतले.

यामुळे मंदिरातील पावित्र्याचा भंग झाला असून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रामदास भोराडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक हाके अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.