Savai Gandharv Mahotsav : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 14 ते 18 डिसेंबर दरम्यान

एमपीसी न्यूज : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Savai Gandharva Bhimsen Mahotsav) दिनांक 14 ते 18 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे.

अभिजात संगीताचा वारसा जपणारा हा महोत्सव संगीतप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. सदर महोत्सव (Savai Gandharv Mahotsav) गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी (bharatratna pandit bhimsen joshi) साजरी करण्यात येईल.

Talegaon : द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस तळेगावच्या सब सेंटर अध्यक्षपदी अजय बवले

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर होत असलेल्या ह्या महोत्सवात जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार असल्याने यावर्षीचा महोत्सव सर्वार्थाने खास असणार आहे. याआधीचा महोत्सव डिसेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.