Talegaon : द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस तळेगावच्या सब सेंटर अध्यक्षपदी अजय बवले

एमपीसी न्युज – द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे सब सेंटरच्या अध्यक्षपदी अजय बवले यांची निवड करण्यात आली. तळेगाव शहराच्या सुनियोजित विकासात आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी, नगरपरिषद व इतर संलग्न संस्थांशी संपर्क साधून, सक्रियपणे भागीदारीमध्ये स्वेच्छेने कल्पना मांडण्यासाठी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टसशी संलग्नपणे द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे सब सेंटर ही संस्था काम करते. 
तळेगाव येथील उपविभागीय वास्तुविशारद स्थापना समारंभ (दि.८) रोजी माळवाडी येथील ऐश्वर्या इस्टीन कॉन्फरन्स हॉल मध्ये होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टसचे राष्ट्रीय अध्यक्ष वास्तुविशारद सी आर राजू,उपाध्यक्ष विलास अवचट, महाराष्ट्र अध्यक्ष संदीप बावडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

तळेगाव नगरपरिषद व अन्य नियोजन प्राधिकरण मध्ये येणाऱ्या निरनिराळ्या समस्यांचे निराकरण करण्यास प्रयत्न करणेसाठी,तसेच नागरिकांमध्ये वास्तुविशारद (आर्किटेक्ट) या पेश्या विषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच आर्किटेक्ट व इंजिनीअर या पेशांमधील फरक सर्वांना समजावा व त्याचा त्यांना लाभ घेता यावा.म्हणून आर्किटेक्ट (वास्तू विशारद) यांनी एकत्र येऊन हि संघटना स्थापन केली आहे.
वास्तुविशारद प्रियांका कौस्तुभ भेगडे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीमध्ये तळेगावची कार्यकारिणी निवडण्यात आली यामध्ये अध्यक्षस्थानी वास्तुविशारद अजय बवले,उपाध्यक्ष राजेश राठोड, खजिनदार संगीता कुवळेकर व सचिव प्रसाद दलाल अशी कमिटी स्थापन केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.