Serial Swamini to start again : पुन्हा रंगणार रमा माधवाची जीवनकथा

Rama Madhav's life story

एमपीसी न्यूज – करोनाच्या प्रकोपामुळे आपल्या अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. मागील काही महिने मनोरंजन क्षेत्रातील सर्वच गोष्टी ठप्प झाल्या होत्या मात्र सध्या अनलॉक २ मुळे काही सवलतींसह शूटिंग सुरु झाले आहे. परंतु दहा वर्षांखालील बालकलाकारांना काम करता येणार नाही. त्यामुळे काही मालिकांचे कथानक बदलावे लागले. त्यात काम करणा-या बालकलाकारांना मोठे झालेले दाखवावे लागले.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेचे देखील चित्रीकरण सुरु झाले आहे. या मालिकेचे नवे भाग २१ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता यात छोट्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत. रमा माधवाचे जीवन चित्रित करणारी स्वामी ही कादंबरी प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे स्वामिनी मालिकेत रमाबाई, माधवराव, गोपिकाबाई आणि इतर कुटुंबीय यांचे नातेसंबंध कसे गुंफले जाणार आहेत याचे प्रेक्षकांना आकर्षण आहे.

‘स्वामिनी’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रुम्स आणि सेटचे सॅनेटायझेशन करण्यात आले. येत्या भागांमध्ये प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत असलेल्या आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत. मोठ्या रमेच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजळणार आहे. मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले. आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पाडेल? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील? रमा आणि माधव यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना कोणाची साथ लाभली? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.