Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ठरली ; पंतप्रधानांना दिल्या दोन तारखा

Bhumi Pujan of Ram temple in Ayodhya was fixed; Two dates given to the Prime Minister

एमपीसी न्यूज – अयोध्येतील राम मंदिर उभारणी बाबत आज रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक पार पडली. मंदिराच्या भूमीपूजनासाठी दोन तारखा ठरवण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमीपूजन केले जाणार असल्याचे कामेश्वर चौपाल यांनी सांगितले आहे.

भूमीपूजनासाठी ठरवण्यात आलेल्या तारखांचा प्रस्ताव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यावर अंतिम निर्णय कोणता घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून दोन्ही पैकी एक तारीख ठरवण्यात येणार आहे.

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल यांच्या अध्यक्षतेसाठी राम मंदिर प्रकरणी बैठक पार पडली. भूमीपूजनाचा अंतिम निर्णय नरेंद्र मोदी घेतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

नियोजित राम मंदिर हे 161 फूट उंचीचे असणार असून यामध्ये तीन ऐवजी पाच घुमट तयार करण्यात येणार आहेत. भूमीपूजनानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.