Sharad Pawar : शरद पवार यांच्या ‘ पक्षाला तुतारीवाला माणूस ‘हे नवं निवडणूक चिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार यांच्या पक्षाला ‘ तुतारीवाला माणूस ‘ हे नवं निवडणूक ( Sharad Pawar) चिन्ह मिळालं आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला होता. त्यानंतर  शरद पवार गटाकडून  तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. परंतु, त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही. तर, निवडणूक आयोगाकडून तुतारीवाला माणूस हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत  हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं.

BJP : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी महेश कुलकर्णी

 

 

BJP : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी महेश कुलकर्णी

एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”, अशी केशवसुतांची कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे.

तसंच, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ साठी गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”, असंही पोस्टमध्ये लिहिण्यात आलं ( Sharad Pawar) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.