Shirur : शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचारावेळी सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते स्टार प्रचारकांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी.पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी 29 जणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा देखील यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून स्टार प्रचारकांची ही यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.