Pimpri : राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

नगरसेवकावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल; परस्परविरोधी फिर्याद दाखल, नगरसेवक आणि टोळक्यामध्ये बिअर शॉपीत राडा

एमपीसी न्यूज- फुकट बिअर घेण्यावरून टोळक्याने बिअर शॉपीत राडा घातला. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बु आसवाणी हे मध्ये पडल्याने त्यांच्यावर पिस्तूल उगारून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. तर निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे काम न केल्याच्या रागातून आसवानी यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतरांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.२६) पहाटे एकच्या सुमारास पिंपरीतील सलोनी हॉटेलमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी हिरानंद ऊर्फ डब्बू किमतराव आसवानी (वय ४९, रा.शनी मंदिराजवळ, पिंपरी) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सचिन राकेश सौदाई (वय ३२ रा. पिंपरी), सनी राकेश सौदाई (वय २८ ), सुनिल मुकेश शर्मा (वय २२), अजय टाक (वय २५), तुषार दुलेकर (वय २५) गोलू पुर्ण नाव माहिती नाही (वय २५) आणि त्यांचे पाच ते सात साथीदारांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, सचिन राकेश सौदाई (वय ३२, रा.सुभाषनगर, पिंपरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार डब्बू उर्फ हिरानंद आसवाणी, लख्खू भोजवानी (वय ४५) सलोनी हॉटेलचे मालक जीजू (पूर्ण नाव माहिती नाही), आसवानी यांचा मुलगा आशिष व अमित, सनी सुखेजा, लखन सुखेजा भरत हिरानंद आसवाणी यांच्यावर मारहाण व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • आसवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आसवाणी यांचे मित्र ललवाणी यांचे पिंपरीत सलोनी हॉटेल आहे. रविवारी पहाटे टोळके हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी बिअर घेतली तसेच पैसे न देता जाऊ लागले. पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद झाले. यावेळी ललवाणी यांनी आसवानी यांना फोन केला असता आसवानी मुलांसह तेथे आले. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली. आरोपी सचिन याने चिडून त्याच्याजवळील गावठी कट्टा आसवणी यांच्यावर उगारला. तर दुसऱ्याने लोखंडी कोयता घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करून पळ काढला. तसेच जात आसवाणी यांचा मुलगा आशीष याच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची ३ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली.

तर,सौदाई याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आसवाणी यांनी मागील निवडणुकीच्या काळात सचिन आणि त्यांच्या भावाने आसवाणी यांचे काम केले नाही याचा राग मनात धरून फिर्यादीशी वाद घातला. तसेच बेकायदा जमाव करून जातीवाचक शिवीगाळ व काचेच्या बाटलीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी त्यांच्यावर तसेच त्यांनी मुले आणि इतर साथीदारणावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस रामचंद्र जाधव अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.