Sinhagad : महापालिकेत नोकरी देतो सांगून उकळले 15 लाख; तीन महिलांची फसवणूक करून आरोपी पसार

एमपीसी न्यूज : महानगरपालिकेत माझी बरीच ओळख (Sinhagad) आहे, असे सांगत तीन महिलांना एकाने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या महिलांपैकी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. तर आशिष तावडे असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही सिंहगड रोड या ठिकाणी राहते. तरुणीची एका परिचितामार्फत आरोपी तावडेशी ओळख झाली होती. तावडेने तरुणीला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते.

तावडेने तक्रारदार तरुणीकडून तसेच तिच्या मैत्रिणीकडून आणि आणखी एका महिलेकडून वेळोवेळी असे एकूण 15 लाख रुपये उकळले.

Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड

इतकंच काय तर विश्वास संपादन करण्यासाठी तावडे याने या महिलांना बनावट सर्टिफिकेट देखील तयार करून दिले होते. त्या तरुणीने जेव्हा तावडेकडे पुढच्या गोष्टींसाठी विचारणा केली तेव्हा त्याने उडवा उडवीचे उत्तर द्यायला सुरुवात केली.

त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात तिने थेट पोलीस (Sinhagad) ठाणे गाठले. पोलीस तावडेचा शोध घेत असून त्याने आणखी किती महिलांना फसवले आहे याचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.