Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव (Talegaon Dabhade) स्टेशन युवक काँग्रेस आय पक्षाच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड करण्यात आली. समीर दाभाडे यांना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले व मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

Pimpri : शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तिकोणे, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

समीर दाभाडे तळेगाव स्टेशन मधील युवक संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी समीर दाभाडे यांनी प्रतिपादन केले.

 

मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे धोरण असून विविध संघटनांची बांधणी करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.