Pune: कलापिनीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मराठी भाषा गौरव दिना निमित्त कलापिनी सांस्कृतिक(Pune) केंद्रात ‘म मराठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मावळ शाखेचेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे उपस्थित होते.

 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अशोक बकरे, विश्वास देशपांडे आणि कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, डॉ अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यीक वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने कलापिनीतील कलाकारांनी कविता,कथा,अनुभव कथन, स्वगत, नाट्यछटा असे साहित्यातील अनेक प्रकार प्रभावीपणे सादर केले.

Pune : संघटन सामर्थ्यातून स्वत: समाज उन्नतीसाठी करण्याची भावना ब्राह्मण समाजामध्ये दिसून येते – चंद्रकांत पाटील

‘जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ या  संपदा थिटे यांनी नुकत्याच संगीतबध्द केलेल्या कलापिनीच्या छोट्या मोठ्या वयोगटाच्या गायक कलाकारांनी सुंदर आवाजात गायलेले मराठी अभिमान गीत , शं वा परांजपे संकुलातील अवकाश रंगमंचावर मोठ्ठ्या जोषात सादर झाले आणि उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच स्वतः मराठी असल्याचा खूप अभिमान वाटला.

मीरा कोन्नूर यांनी इंदिरा संतांची ‘अक्कूबक्कूची दिवाळी ‘ही कविता सादर केली. अरुंधती देशपांडे यांनी एक पत्रकार आणि सात लेखकांची लेखनशैली किती वेगवेगळी असू शकते हे प्रभावीपणे सादर केले.

 

मीनाक्षी झेंडे यांनी ‘मी ध्यानधारणा करते’ ही नाट्यछटा सादर केली. सुमेध सोनावणे याने स्वरचित एका चित्रकारावरची कविता अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. अनघा कुलकर्णी लिखीत ‘माझी अक्की’ही नाट्यछटा कुमारभवनच्या श्रीमयने आपल्या  सुंदर अभिनयाने  सादर केली.

 

केतकी लिमयेनी परदेशात असलेल्या महाराष्ट्रियन विद्यार्थ्यांचे क्लास घेतांना त्यांची मातृभाषा समृध्द होण्यासाठी अनुभव कसे असतात याचं विश्लेषण केले. मधुवंती रानडे यांनी ‘मी मध्यमवर्गीय ‘ हे स्वगत सादर केले. ॠचा पोंक्षे यांनी आपल्या ‘वारी ‘ या कवितेतून प्रत्यक्ष विठुरायाशी साधलेला संवाद सर्वांनाच निशब्द करुन गेला.

 

अनघा बुरसे आणि राखी भालेराव यांनी सादर केलेला गंमतीशीर संवाद सगळ्यांचीच दाद मिळवून गेला. अंजली सहस्त्रबुध्दे यांनी सादर केलेली सुधा मूर्तिंची कथा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरली.

 

मेधा रानडे यांनी सुप्रसिध्द गीतकार पी.सावळाराम यांचे वसंत प्रभू यांनी संगीतबध्द केलेले ‘ज्ञानदेव बाळ माझा’ हे गीत सादर केले .या गाण्याला ज्योती भोपळे यांनी हार्मोनियम आणि तबल्याची साथ चैतन्य लोवलेकर यांनी केली. समीर महाजन यांनी स्वरचित कविता सादर केली. डॉ. आश्विनी परांजपे यांनी सादर केलेल्या ‘कोकीळेचं पोर ‘ या कथेनी सर्वांची मने जिंकली. उत्तमोत्तम सादरीकरणांनी कार्यक्रम एका वेगळ्यांच उंचीवर नेवून ठेवला आणि खऱ्या अर्थाने ‘मराठी गौरव भाषा दिन ‘ साजरा झाला.

 

ज्योती गोखले, दिपाली जोशी, अरूणा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनया केसकर, चेतन पंडित, प्रतिक मेहता, विराज सवाई, रामचंद्र रानडे, छाया हिंगमिरे आणि श्यामली देशमुख यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.