Sobat Sakhichi : सोबत सखीची – डाएट पिंपल्स रोखणारा

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. डाएट पिंपल्स रोखणारा… या विषयावरील या मालिकेतील हा​ ​​​अकरावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 11

डाएट पिंपल्स रोखणारा

नमस्कार, सोबत सखीची या लेखमालेत मी आपल्या सगळ्यांच स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉ गौरी.मागच्या लेखांमध्ये आपण पिंपल्सबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेतली. मला माहित आहे आता आपण सर्वजण पिंपल्स वरची treatment ऐकण्यासाठी उत्सुक आहात. चला तर मग पिंपल्सचा त्रास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्ये कोणत्या कारणांमुळे पिंपल्स होताहेत हे शोधून काढणे आणि त्याप्रमाणे treatment करणे फार महत्वाचे आहे.बर्‍याच जणांमध्ये
स्कीनची योग्य प्रकारे काळजी न घेणे, चुकीचा आहार घेणे,sedentary लाइफस्टाईल असणे यासारखी एकेक किंवा एकाच वेळी अनेक कारण मुळाशी असतात. यापैकी स्कीनची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स आपण मागच्या एका व्हिडिओ मध्ये बघितल्या आहेत.

आता पिंपल्सची ट्रीटमेंट आपण तीन स्तरावर पाहू.ते म्हणजे आहार,विहार आणि औषधे… आपल्यापैकी बर्‍याच जणांना रोजच्या आहारात तिखट,तेलकट,
चमचमीत,मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ यांचे वरचेवर सेवन करायची सवयअसतेतर काही जणांच्या आहारात भरपूर गोड पदार्थ असतात. हे पदार्थ खाताना त्या क्षणी जिभेला जरी हवहवेसे वाटत असले तरी पिंपल्ससाठी आणि एकंदरीत शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. कोणत्याही प्रकारचा अतिरेक न करता योग्य मात्रेत आणि संतुलित स्वरूपाचा आहार घेणे फार महत्वाचे आहे.

आयुर्वेदानुसार सहा चवीचा आणि आधुनिक आहारशास्त्रानुसार macro आणि micro nutrients चा समावेश असलेला आहार आरोग्यासाठी परिपूर्ण आणि पूरक असतो. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय अर्थात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवी आहेत. तर कार्बोहायद्रेट, proteins, fats, हे macro nutrients आणि vitamins आणि minerals हे micro nutrients हे

त्या सहा प्रकारच्या चवींच्या पदार्थातून मिळणारे घटक आहेत. यापैकी पिंपल्सच्या दृष्टीने कोणता आहार महत्वाचा याच्या टिप्स आपण जाणून घेऊ. आपल्या आहारातून रोज प्रत्यक्ष नाहीतर अप्रत्यक्षरित्या मधुर रसआपल्या शरीरात जातच असतो.

साखर, गूळ, मध यांच्यामधून प्रत्यक्षरित्या तर धान्य, कडधान्य, भाज्या, पालेभाज्या, फळं यातून अप्रत्यक्षरित्या शरीरात मधुर रस जात असतो. यातली प्रत्यक्ष स्वरूपातली साखर म्हणजे साखर, गूळ आणि मध यांच्या सेवनाने डायरेक्ट रकतातल्या साखेरचे प्रमाण वाढते. यांना simple कार्बोहायड्रेट म्हणतात. आणि भाज्या, फळ, धान्य कडधान्य यांच्यातून अप्रत्यक्ष रित्या साखर वाढते. त्यांना complex carbohydrate म्हणतात.

हेल्दी व्यक्तींच्या आहारात simple sugar चे प्रमाण 20 ते 25 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. अति प्रमाणात शुगर किंवा सिंपल कार्बोहायड्रेट यांचा वापर म्हणजे स्थूलपणा, डायबेटीस यांना आमंत्रण त्याशिवाय insulin आणि इतर महत्वाच्या स्ट्रेस हार्मोन मध्ये बिघाड. आणि एकदा एक हार्मोन बिघडले की इतर हार्मोन चे देखील संतुलन बिघडते. आणि हार्मोनल acne चेहर्‍यावर दिसायला सुरुवात होते. त्यामुळे पिंपल्सचा त्रास असणार्‍या स्थूल व्यक्तींनी आणि हार्मोनल acne असणार्‍या व्यक्तींनी अति गोड खाणे टाळावे. तसच अति प्रमाणात तिखट तेलकट पदार्थ खाणार्‍या व्यक्तींनी देखील काळजी घेतली पाहिजे. कारण अशा लोकामध्ये शरीरात मोठ्या प्रमाणात पित्त साठून त्याच्या परिणाम स्वरूप inflammatory acne वाढण्याची शक्यता जास्त असते. स्थूल असलेल्या आणि हार्मोनल acne चा त्रास असणार्‍या व्यक्तींसाठी आहारात एक साधा बदल खुप फायदेशीर ठरतो.साखर, गूळ आणि मध सुद्धा 1 महिन्यासाठी ban करून बघण्याचा. यापैकी कोणत्याही घटकाचा वापर करून बनवलेला पदार्थ

एक महिना नाही खायचा. एका महिन्यात पिंपल्स लक्षणीय रित्या कमी होतात. वजन एक ते दीड किलोने कमी तर होतेच, त्या शिवाय इतर हेल्थ बेनीफिट मिळतात ते वेगळेच.शरीरासाठी आवश्यक असणारी शुगर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पासून मिळवली तर त्यातून प्रोटीन,fats, फायबर सारखे इतर घटक सुद्धा मिळतात.

आपल्या आहारात प्रोटीन्सचा योग्य प्रमाणात समावेश असावा. वनस्पती पासून मिळणारे proteins म्हणजे वेगवेगळ्या व प्राण्यांपासून मिळणारे proteins या दोन्हीचा आहारात समावेश करायला हवा. प्रोतीन्स तर शरीराला आवश्यक असतातच आणि आपला भारतीय आहार खूपदा प्रोटीन मध्ये मागेच असतो. त्यामुळे रोजच्या आहारातुन मिळणार्‍या प्रोटीनमुळे त्रास झाला असं सहसा कधी होत नाही पण येस, बाजारात मिळणार्‍या प्रोटीन पावडर जर नीट पारखून न घेता त्याचा अति उपयोग केला तर मात्र काही जणांना चेहर्‍यावर, मानेवर, पाठीवर पिंपल्स येण्याची शक्यता असते.

fatsच्या बाबतीत मात्र सतर्क रहायला हवे. हे saturated fat आहे की unsaturated fat यावर ते healthy आहे की नाही ते ठरत.Saturated fats जनरली दूध, लोणी, तूप, प्राण्यांचे मांस, मासे यांच्यातून मिळतात तर Unsaturated fatवेगवेगळ्या वनस्पतींच्या तेल बियांपासुन मिळतात. या दोन्हींचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरास फायदाच होतो. पण या saturated fat मध्ये अजून एक प्रकार आहे trans fat ज्यामध्ये बेकरीतले बरेचसे प्रॉडक्ट तयार केले जातात.

पिझ्झा, बर्गर, हॉटेल मध्ये मिळणारी पावभाजी या पदार्थांचा तो अविभाज्य भाग आहे.बेकरी मधला कुठलाही पदार्थ अधिक टेस्टी होण्याच्या दृष्टीने आणि शेल्फ लाईफ वाढवण्याच्या दृष्टीने ट्रान्स fatty अ‍ॅ​सिड ​ मध्ये तळला जातो. अशा ट्रान्स fat चे प्रमाण आहारात वाढले की सीबम च्या combination मध्ये फरक पडतो. सीबम जास्त चीजी आणि घट्ट बनत. जे pores मधून बाहेर निघायलाही प्रॉब्लेम होतो. Occasionally असे पदार्थ खाण वेगळं पण रोजच्या आहाराचा भाग म्हणून खाण मात्र वाईट. कारण ट्रान्स fatty ​अ‍ॅ​सिड शरीरात एकदा घुसले की त्यांना बाहेर पडायला काहीही वाट नाही. ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तराला चिकटून रहातात. आजच्या तरुणाई चे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम्स obesity, डायबेटीस, हार्ट डिसीज हे या ट्रान्स fat मुळे होतात. यासाठी पिंपल्सचा त्रास होणार्‍या सर्वांनी शक्य होईल तितके आपल्या लाइफ मधून ट्रान्स fat मध्ये बनवलेले बेकरी प्रॉडक्ट, फास्ट फूड आणि जंक फूड ban करून टाका.

आपण आहारात गोड, आंबट, तिखट चवीचे पदार्थ आणि लोणची, पापड, वेफर्स सारखे खारट पदार्थ आपण आवडीने खातो. पण कडू आणि तुरट या चवींचे पदार्थ आपण तेवढ्याच आवडीने खातो का ? नाही खात….पण आपल्याला त्वचेचे विकार आणि पर्यायाने पिंपल्सच्या विकारांपासून सुटका हवी असल्यास कारल्यासारखे कडू आणि तोंडल्यासारखे तुरट पदार्थांचा देखील आहारात समावेश करायला हवा. हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या भाज्या आणि फळे, यातून मिळणारे व्हीटामिन A,E, झिंक, ​Anti oxidants, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया, फिश पासून मिळणारे ओमेगा 3 fatty acids यांचा वापर पिंपल्स कमी होण्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरतो.

एकंदरीत सर्व प्रकारच्या चवीनी युक्त असलेला, आपल्या प्रकृतीला हितकारक असलेला आणि संतुलित मात्रेत असलेला आहार सेवन करणे हे प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यायाने स्कीनच्या दृष्टीन महत्वाच आहे. I hope, आजच्या लेखातून तुम्हाला पिंपल्स आणि आहार यांचा संबंध आणि पिंपल्स मध्ये पथ्यकर आणि अपथ्यकर आहार कोणता याबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. आपल्याला हा लेख / video कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेन्ट बॉक्स मध्ये मला जरूर प्रश्न विचारा मी नक्की उत्तर देईन. पुढच्या लेखात / व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत व्यायामांविषयी. पिंपल्स आणि व्यायाम यांचा काय संबंध आहे? पिंपल्सचा त्रास असेल तर कोणत्या व्यायाम प्रकारांचा उपयोग होऊ शकतो हे पाहू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद!

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.