Sobat Sakhichi : सोबत सखीची – व्यायाम पिंपल्स रोखण्यासाठी

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. ट्रीटमेंट पिंपल्सची… या विषयावरील या मालिकेतील हा​ तेरावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 13

ट्रीटमेंट पिंपल्सची

आपला चेहरा नितळ आणि तजेलदार दिसावा असं तुम्हाला देखील वाटतं का ? आणि वरचेवर येणार्‍या पिंपल्समुळे तुम्ही देखील त्रस्त आहात का? आजच्या  लेखामध्ये आपण पिंपल्स साठी उपलब्ध असणार्‍या वेगवेगळ्या ट्रीटमेंट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मागच्या चार लेखामध्ये आपण पिंपल्स ची वेगवेगळ्या स्वरूपातली माहिती बघितली होती, आज आपण पिंपल्सची तीन स्तरावर ट्रीटमेंट बघू.

पहिला प्रकार आहे topical treatment. म्हणजे पिंपल्सच्या जागेवर किंवा चेहर्‍यावर बाहेरून लावायचे उपाय. यासाठी काही घरगुती उपाय आधी आपण पाहू.

  1. हळद आणि कोथिंबीरीची पाने यांची पेस्ट करून चेहर्‍याला लेप लावल्यास चेहर्‍यावरचे ब्लॅक heads कमी होतात.
  2. चमचाभर दही त्यात थोडेसे बेसन पीठ घालून चेहर्‍याला लेप लावल्यास बेसनची cleansing property आणि दहयाची
  3. moisturizing property यामुळे चेहरा छान उजळ होतो. मुलतानी माती व लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍याला लावल्याने पिंपल्स च्या जखमा आणि पिंपल्समुळे झालेले व्रण कमी होतात.
  4. Aloe वेरा अर्थात कोरफडीचा गर मिक्सर मधून काढून एक चमचा गरात लिंबाचे तीन चार थेंब मिसळून त्याची पेस्ट चेहर्‍याला लावल्यास उन्हामुळे काळवंडलेली त्वचा छान तजेलदार होते आणि चेहर्‍यावर आलेले डार्क स्पॉट्स फेंट व्हायला मदत होते.
  5. चेहरा जर खूप oily असेल तर मध आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण चेहर्‍याला लाऊन 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. यामुळे चेहर्‍यावरचा अतिरिक्त तेलकटपणा कमी व्हायला मदत होते.
  6. आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्यानुसार हळद, मंजिष्ठा, सारीवा, चन्दन यापैकी आपल्या स्कीनला सुटेबल असणार्‍या औषधींचा लेप चेहर्‍यावर लावावा.
  7. बरेचदा retinoid, clindamycin, azilic अ‍ॅसिड, dapson यासारख्या अनेक वेगवेगळ्या औषधांचा पिंपल्स असलेल्या भागावर क्रीम, जेल किंवा फेस वॉश यांच्या स्वरुपात वापर केला जातो. अर्थात प्रत्येकाच्या स्कीनच्या आणि पिंपल्सच्या टाईप नुसार यामध्ये औषधाच सिलेक्शन केलं जातं. घरगुती उपायांनी अथवा आपल्या फॅमिली डॉक्टर च्या सल्ल्याने उपचार करून उपयोग न झाल्यास cosmetologist किंवा dermatologist यांचा सल्ला जरूर घ्यावा.

दूसरा प्रकार आहे oral medicines – अर्थात तोंडावाटे घ्यायची औषधं. बरेचदा पिंपल्स severe टाइपचे असतात. अशा वेळी पोटात antibiotics ची औषधं घ्यावी लागतात. Isotretinoin सारख्या vitamin A च्या derivativeअसलेल्या, azilic अ‍ॅसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हार्मोनल acne असणार्‍या व्यक्तींमध्ये oc pills किंवा anti androgen सारखी हार्मोनल treatment देखील घ्यावी लागते. पण यांचे काही side effects सुद्धा असतात आणि व्यक्तींनुसार औषधाचे selection आणि त्याचा डोस देखील बदलत असल्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय त्यांचा वापर करू नये. बरेचदा पचनाची तक्रार असेल किंवा रक्ताचे काही विकार असतील तर त्यासाठी देखील पोटात औषधं घ्यावी लागतात.

तिसरा प्रकार आहे –पिंपल्स च्या advanced स्टेजला पोचेपर्यंत पिंपल्समुळे चेहर्‍यावर खूप डाग आणि खड्डे तयार झाले असतात. त्यासाठी कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा चांगलाच उपयोग होतो. या ट्रीटमेंट साठी कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये जाऊन काही सेटिंग्स घ्यावी लागतात. याची प्रत्येक सेटिंग थोडी costly असली तरी त्यामुळे चेहर्‍यात आमुलाग्र बदल होतो त्यामुळे या प्रकारची ट्रीटमेंट आजकाल खूप पॉप्युलर व्हायला लागली आहे.यामध्ये नवनवीन treatments येतच असतात. याचे काही प्रकार आपण जाणून घेऊ.

  1. लेझर ट्रीटमेंट – या मध्ये पिंपल्स च्या जागेवर विशिष्ट frequency चे यूव्ही rays सोडले जातात. त्याचा inflammatory acne वर चांगला उपयोग होतो.
  2. केमिकल peel – या मध्ये त्या वेळचा स्कीन चा type बघून काही विशिष्ट प्रकारची chemicals चेहर्‍यावर लावली जातात. यामुळे superficial epidermis मधला dead cells चा लेयर वॉश आऊट होतो. Blackheads,whiteheads, चेहर्‍यावर पडलेल्या बारीक सुरकुत्या या सर्वांसाठी केमिकल पिल ही एक उपयुक्त आणि कमीत कमी त्रासाची ट्रीटमेंट आहे. चेहर्‍याच complexion सुधारायला याचा फार चांगला उपयोग होतो. मात्र यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांची किमान पाच ते सहा सेटिंग्स घ्यावी लागतात.
  3. तिसरा प्रकार आहे steroid injections. Cystic acne किंवा nodular acne यांचा त्रास असल्यास त्या ठिकाणच्या त्वचेमध्ये steroid चे इंजेक्शन दिले जाते.

चौथा प्रकार आहे cryo थेरपी – यामध्ये liq नायट्रोजनचा स्प्रे च्या स्वरुपात वापर केला जातो. यात पिंपल्सच्या severity नुसार liq नायट्रोजनचा स्प्रे पिंपल्स च्या भागावर मारला जातो व भाग तो फ्रीज केला जातो. त्यामुळे त्याची inflammatory growth थांबते. हळूहळू त्यातील पेशी मृत होतात व नैसर्गिक रित्या acne heal होतात. ही एकदम painless म्हणजे अजिबात न दुखणारी साधी आणि सोपी ट्रीटमेंट आहे.

आत्तापर्यंत पाहिलेल्या treatments या actual पिंपल्स साठी केल्या जाणार्‍या treatments आहेत. पण already ज्यांच्या चेहर्‍यावर पिंपल्स मुळे scars तयार झाले आहेत किंवा pigmentation झालं आहे, अशा लोकांसाठी पुढच्या तीन ट्रीटमेंट फार उपयुक्त ठरतात.

  1. लेझर – ही जशी पिंपल्स साठी करता येते, तशीच ती पिंपल्स मुळे झालेले scars आणि pigmentation यांच्यासाठी देखील केली जाते. याची मशीनरी देखील वेगळी असते आणि यात पिंपल्सपेक्षा वेगळ्या frequency चे rays वापरले जातात जे पिंपल्स च्या ट्रीटमेंट पेक्षा वेगळ्या प्रकरणे act होतात. यामध्ये एकेक महिन्याच्या अंतराने किमान 6 ते 7 सेटिंग्स घ्यावी लागतात.
  2. micro needling – यामध्ये जुन्या जखमांचे डाग असलेल्या भागावर एकदम fine needles ने पंक्चर केले जाते. साधारण एक महिन्याच्या अंतराने याची पाच ते सहा सेटिंग्स दिली जातात. यामुळे स्कीनचं texture सुधारायला, चेहरा smooth व्हायला मदत होते. यामध्ये काही पेशी नव्याने तयार होऊन जखमांचे खड्डे भरून यायला मदत होते.
  3. subcision– बरेचदा एकाला लागून एक असे अनेक पिंपल्स येऊन त्याच्या जखमांमुळे चेहर्‍यावर मोठा scar तयार झाला असतो. आणि हळूहळू काही वर्षांमध्ये त्याच्या खाली fibrous band तयार होऊन जखमा आकसल्यासारख्या दिसतात. Subcision या प्रकारात जर चेहर्‍यावरील scar मोठा असेल तर त्या scar च्या खाली needle घालून तयार झालेले band ब्रेक केले जातात. त्यामुळे नवीन पेशी तयार होण्यासाठी आणि
    आधीचा खड्डा भरून येण्यासाठी चालना मिळते.
  4. Filler – यामध्ये पिंपल्स मुळे झालेल्या खड्ड्यांच्या आत आणि स्कीन च्या आतल्या लेयर मध्ये injection दिलं जातं. यात खालच्या पेशी फुगल्यामुळे खड्डा भरून येतो. यातल्या काही ट्रीटमेंट permanentअसल्या तरी बर्‍याच ट्रीटमेंट temporary असल्यामुळे ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा सेटिंग्स घ्यावी लागतात.

आजचा लेख आणि एकंदरीत पिंपल्स शी रिलेटेड असलेले हे पाच ही video लेख आपल्याला कसे वाटले ते नक्की लिहा. पुढच्या आठवड्यात नवीन विषयाला सुरुवात करूया. धन्यवाद!

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल: 9423511070

ई-मेल: [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.