Pune News: स्वतःचा आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाकडून ‘पीपीई किट’चा वापर

​एमपीसी न्यूज ​- कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी खबरदारी बाळगताना दिसतो. पुण्यात तर कोरोनाची रुग्ण संख्या मोठी आहे आणि हा आकडा दररोज वाढतच आहे.

अनलॉक नंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने रिक्षा चालकांनाही वाहतुकीची परवानगी दिली आहे. रिक्षाचालकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पुण्यातील एक रिक्षाचालक स्वतःची आणि प्रवाशांची काळजी घेण्यासाठी पीपीई किट घालून रिक्षा चालवताना दिसतो. पीपीई किट घालणाऱ्या या रिक्षाचालकाचा फोटो अनेकांना शेअर केला आहे.

प्रभू बनशेट्टी असे रिक्षाचालकाचा नाव आहे. याविषयी सांगताना ते म्हणतात. पीपीई किटमध्ये गरम होणे, अस्वस्थ वाटते, जेवता न येणे अशा अनेक समस्या आहेत. मात्र तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून मी पीपीई किट घालूनच रिक्षा चालवतो. त्यामुळे कितीही उन्हाळा असला तरी मी पीपीई किट वापरणं सोडलं नाही. कोणी कितीही हसलं तरी स्वतःच्या सुरक्षेसाठी मी आवर्जून पीपीई किट वापरतो, इतकंच नाही तर मी या काळात कोरोना रुग्णांचीही वाहतूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.