23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Maval News: इंद्रायणी नदीच्या पुलावरील धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – आंबी औद्योगिक क्षेत्राच्या कातवीजवळील रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या व रेल्वेच्या पुलावरील दोन्ही बाजूंचे जोड उखडलेले असून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी तळेगावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे. 

नदीच्या पुलावरील जोड उखडून सळया बाहेर आल्याने वाहनांचे टायर फुटून छोटे- मोठे अपघात झालेले आहेत. रात्री अपरात्री वाहनांची वर्दळही ह्या रस्त्यावर मोठी असते. रात्री दुचाकी अडखळून वाहन चालक रस्त्यावर पडून अपघाताच्या  घटना घडलेल्या आहेत.

ह्या रस्त्यावरील दोनही पुलांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. सुरक्षितता व संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने नदीच्या पुलावरील उखडलेल्या जोडांची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डोळस यांनी केली आहे.

spot_img
Latest news
Related news