Solapur : फेसबुकवर स्वतःच्याच श्रद्धांजलीची पोस्ट; पोलीसाने कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर झाडल्या तीन गोळ्या

एमपीसी न्यूज – सोलापूर येथील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या ( Solapur ) एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. दरम्यान या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्याच श्रद्धांजलीची पोस्ट या घटनेपूर्वी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर पोलीस दल हादरले आहे.

विकास गंगाराम कोळपे असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

Express Way Accident : बोरघाटात खासगी बसला अपघात; चालकाचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकास कोळपे हे सोलापूर जिल्हा कारागृहात गार्ड म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांनी शनिवारी (दि. 9) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली. त्यामध्ये ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ असे म्हणत त्यांनी स्वतःची जन्मतारीख आणि मृत्यूचीही तारीख लिहिली आहे.

वरिष्ठांची नावे लिहून आपण त्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे कोळपे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. कोळपे यांनी कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू ( Solapur )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.