Pune : पाणी पाइपलाइन प्रकल्पासाठी बाणेर ते परिहार चौक मार्गात तात्पुरता बदल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) पाण्याच्या ( Pune ) पाईपलाईनच्या कामासाठी  5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत बाणेर ते परिहार चौक या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.

पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आयटीआय रोडवरील विस्तृत पाइपलाइनच्या कामामुळे वाहतूक प्रवाहात तात्पुरता बदल करणे आवश्यक आहे. पाइपलाइन टाकण्याची क्रिया रस्त्याच्या मध्यभागी केंद्रित आहे.त्यामुळे  5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत वाहतूकीत  बदल केले जातील.

Solapur : फेसबुकवर स्वतःच्याच श्रद्धांजलीची पोस्ट; पोलीसाने कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर झाडल्या तीन गोळ्या

बाणेर फाट्यावरून परिहार चौकाकडे जाणार्‍या वाहनधारकांना बाणेर फाट्यावर डावीकडे वळावे, सीझन्स रोडवरील ईश्वर मेडिकलपासून उजवे वळण घ्यावे, त्यानंतर अविक पॉलीकेम येथे दुसरे उजवे वळण घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परिहार चौकात जाण्यासाठी ते आयटीआय रोडवरून सरळ पुढे जाऊPune ) शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.