Pimpri : पीएमपीएमएल कडून पुणे व पिंपरीतील काही मार्गात बदल तर काहींचा विस्तार

एमपीसी न्यूज – प्रवाश्यांची मागणी प्रतिसाद पाहता पीएमपीएमएल प्रशासनाने तीन बस मार्गांचा विस्तार केला आहे तर दोन मार्गात बदल केले आहेत. ज्यामध्ये पुण्याबरोबरच पिंपरीचाही (Pimpri) समावेश आहे. हे बदल येत्या गुरुवार (दि.25) पासून करण्यात येणार आहेत.

Shirur : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष पदी किरण पन्हाळे यांची नियुक्ती

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे

1) मार्ग क्रमांक 26 – धनकवडी ते शिवाजीनगर मार्गे – स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड बस संख्या – 2 वारंवारिता – 55 मिनिटे

2) मार्ग क्रमांक 50 – शनिवारवाडा ते सिंहगड पायथा या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिवार वाड्यापर्यंत करण्यात आला आहे. बस संख्या – 4 वारंवारिता – 50 मिनिटे

3) मार्ग क्रमांक 88 – अप्पर ते मेडी पॉईंट या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे अप्पर डेपो पर्यंत करण्यात आला आहे. बस संख्या – 2 वारंवारिता – 1 तास 10 मिनिटे

4) मार्ग क्रमांक 376 – मनपा भवन ते पिंपरीगाव या मार्गाचा विस्तार मासुळकर कॉलनी च्या पुढे पिंपरीगाव (Pimpri) पर्यंत करण्यात आला आहे. बस संख्या – 2 वारंवारिता – 1 तास 30 मिनिटे

5) मार्ग क्रमांक 311 – पिंपरीगाव (Pimpri) ते पुणे स्टेशन या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात आला आहे. बस संख्या – 2 वारंवारिता – 1 तास 30 मिनिटे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.