Shirur : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष पदी किरण पन्हाळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या (Shirur) पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी किरण तुकाराम पन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली. शिरूर येथे झालेल्या कामगार मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हा नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पन्हाळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माजी नगरसेवक संतोष कोकणे, युनियनचे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे, उद्योजक प्रशांत मळेकर, सामाजिक कार्यकर्ते सुमित तावरे यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Bhosari : जमली गप्पांची मैफिल; भरला 21 वर्षांनी शाळेचा वर्ग!

माजी जलसंपदा मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून राज्यभर काम सुरु केले आहे. संघटनेचा विस्तार करणे आणि सभासद संख्या वाढवून त्यांच्या (Shirur) अडीअडचणी सोडविण्यासाठी युनियनने आता संघटना मजबूतीवर अधिक भर दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.