Chandrashekhar Bawankule : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट शरद पवारांना इशारा

एमपीसी न्यूज : प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी आपले मिशन बारामती बोलून दाखवले होते. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच सडकून टीका केली आहे. नितीश कुमार आणि शरद पवार यांच्या कितीही भेटी झाल्या तरी काहीही फरक पडणार नाही.(Chandrashekhar Bawankule) तिसरी चौथी पाचवी किंवा आणखी कुठलीही आघाडी केली तरी फायदा होणार नाही. ते नरेंद्र मोदींची बरोबरी करू शकत नाहीत अशी खोचक टीका करतानाच त्यांनी शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत असा इशाराही दिला.

माध्यमांची संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नितीश कुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे देखील भाजपची कृपा आहे. नितेश कुमार यांनी सुद्धा दगाबाजी केली आणि इकडे उद्धव ठाकरे यांनी देखील दगाबाजी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार असं देखील मिळाले.

love-jihad case : अमरावती लव-जिहाद प्रकरणातील तरुणी अखेर पुणे पोलिसांना सापडली

यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीविषयी देखील भाष्य केले. बावनकुळे म्हणाले येणाऱ्या महापालिका आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढू आणि जिंकू सुद्धा.(Chandrashekhar Bawankule) मुंबई आणि पुण्यात भाजपचाच महापौर असणार आहे. कुठलीही निवडणूक येऊ द्या नंबर एकचा पक्ष भाजपच असेल महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून ते महापौरांपर्यंत निवडून येतीलच असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.