Pune leopard : पुण्यात खडकवासला परिसरात बिबट्याचा मुक्त वावर

एमपीसी न्यूज: पुण्यातील खडकवासला परिसरातील एका गावात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मी टेक्नॉलॉजी या ठिकाणी हा बिबट्या वावरत असताना दिसून आले आहे.(Pune leopard) या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत हा बिबट्या मुक्तपणे वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. कुत्रे जोरजोरात ओरडत असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात कैद केली आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुत्र्याचे आवाजानंतर काही कर्मचारी जागे झाले होते. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एका झाडावर बिबट्या दिसून आला.(Pune leopard) तर कुत्रे त्या दिशेने पाहून जोरजोरात भुंकत होते. अखेर बिबट्या खाली उतरला आणि त्याने कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड केला.

Chandrashekhar Bawankule : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट शरद पवारांना इशारा

त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वनविभागाला कळवण्यात आली.(Pune leopard) त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सतर्क झाले आहेत. वन विभागाने या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. वन विभागाने बिबट्याचा संचार आढळून आल्याने स्थानिकांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी आणि लहान मुलांना एकटे सोडू नये अशा सूचना केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.