Alandi snake rescue : घोणस जातीच्या सापाला आळंदी मध्ये जीवदान

एमपीसी न्यूज : बुधवार रोजी आळंदी येथील माऊली पार्क मध्ये चार फुटाची घोणस प्रसाद जगताप यांना त्यांच्या घरासमोरील गेटजवळ आढळून आली.(Alandi snake rescue) याची वार्ता रोहित फड यांना कळाली. त्यानंतर तत्काळ तिथे जाऊन रोहित फड यांनी ती घोणस आपल्या कौशल्या द्वारे पकडून तिला प्लास्टिकच्या मोठया बरणीत ठेवण्यात यश मिळवले .त्यानंतर सर्प मित्रांना बोलवून ती त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

Pune leopard : पुण्यात खडकवासला परिसरात बिबट्याचा मुक्त वावर

सर्प मित्रां कडून त्यावेळी सांगण्यात आले की,ही विषारी घोणस आहे. (Alandi snake rescue) सर्प मित्रांनी तीला वनविभागात सोडून दिले. माऊली पार्क मध्ये राहत असलेल्या रोहित फड यांनी त्याच भागातील चार साप याआधी पकडून वडगांव घाटातील वनविभागात सोडून दिले आहेत. प्रसाद जगताप बाहेरून घरी येत असताना ही बाब समोर आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.