Pune Grampanchayta election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 61 पदांसाठी 212 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत पदासाठी निवडणूक जाहीर झाली असून पुणे जिल्ह्यात येत्या 18 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 61 ग्रामपंचायतची निवडणूक पार पडणार आहे. तर या 61 सरपंच पदासाठी 212 जण मैदानात उतरले आहेत. एकूण 315 अर्ज सरपंच पदासाठी आले होते.(Pune Grampanchayta election) मात्र त्यातील 103 जणांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे 485 सदस्य पदासाठी 696 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 18 सप्टेंबर रोजी यासाठीची निवडणूक होणार असून 19 सप्टेंबरला मतमोजणी जाहीर केली जाणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षी सरपंच पदाची निवडणूक थेट होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 315 उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज केला होता. मंगळवार हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.त्यानुसार 103 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. आणि शेवटी 212 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Alandi snake rescue : घोणस जातीच्या सापाला आळंदी मध्ये जीवदान

राजे निवडणूक आयोगाने राज्यातील 1166 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही ठिकाणी 13 तर काही ठिकाणी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.(Pune Grampanchayat election) पुणे जिल्ह्यातील बारपे बुद्रुक आणि चांदखेड या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.