Pune congress : भाजप आमदार सुनिल कांबळेसह इतरांवर गुन्हा दाखल करा – काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : गंगाधाम चौक नजीकच्या आंनदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करा म्हणणाऱ्या भाजपाचे आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशा मागणीचे निवेदन (Pune congress) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना आनंदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करून घेतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. आमदार, नगरसेवक आणि माजी नगरसेविकेचे पती व त्यांच्या सोबत असलेले रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे या कारवाईमध्ये दिसत आहेत हे निदर्शनास आणून दिले.(Pune congress) याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी.

Pune Grampanchayta election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 61 पदांसाठी 212 उमेदवार रिंगणात

आनंदनगर वसाहत येथे 24 तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. अनाधिकृत इमारतीत झालेल्या सक्तीच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.