Chinchwad : पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा, आमदार अश्विनी जगताप यांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – वाकड, रावेत, किवळे, मामुर्डी, पिंपळेनिलख, काळेवाडी मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. (Chinchwad) या भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. महापालिका रुग्णालयात मोफत डायलेसिस सेंटरकरिता जागा उपलब्ध करावी. थेरगाव रुग्णालयात कर्करोग युनिट सुरु करावे, अशा सूचना चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी प्रशासनाला दिल्या.

चिंचवड मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी आज (बुधवारी) सर्व माजी नगरसेवकांसह आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. माजी नगरसेवक शंकर जगताप, नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, अंबरनाथ कांबळे, सुरेश भोईर, शशिकांत कदम, सागर अंगोळकर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, संदीप कस्पटे, बाबा त्रिभुवन, हर्षल ढोरे, शेखर ओव्हाळ, संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेविका उषा मुंडे,  ममता विनायक गायकवाड, संगीता भोंडवे, सविता खुळे, सुनिता तापकीर, मनीषा पवार, नीता पाडाळे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे व अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व खाते प्रमुख उपस्थित होते.

Chikhali : चिखली पोलीस ठाण्याला मिळणार पूर्णानगर येथील जागा

आमदार जगताप म्हणाल्या, कचरा सेवा शुल्क रद्द करावे. सांगवी-बोपोडी पुलाबाबत पुणे पालिका, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राच्या अधिका-यांसोबत बैठक घ्यावी. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी. सेफ्टी ऑडीट करावे. सीओईपीच्या माध्यमातून होर्डिंग उभारण्याचा आराखडा तयार करावा.(Chinchwad) मुकाई चौक ते निगडी प्रलंबित 45 मीटर डीपी रस्ता पूर्ण करावा. नानासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्ग बीआरटीएस रोड टी मार्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. लाईटची व्यवस्था करावी.

साईनगर, मामुर्डी भागातील सेवा रोड, रस्ते डांबरीकरण करावे. पथदिवे बसवावेत.  रावेत भागातील चेंबर, रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. पिंपळे सौदागर परिसरात नवीन बांधण्यात आलेल्या टाकीतून पाणीपुरवठा करावा. थेरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मारक उभारावे. (Chinchwad) स्मार्ट सिटीच्या कामाला गती द्यावी.  सांगवी – किवळे रस्त्यावरील सांगवी फाटा चौकामध्ये सुशोभीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.