Chikhali : चिखली पोलीस ठाण्याला मिळणार पूर्णानगर येथील जागा

एमपीसी न्यूज – शहरातील चिखली पोलीस ठाण्यासाठी पूर्णानगर, चिखली येथील मध्यवर्ती सेवा केंद्रातील 900 चौरस मीटर जागा संपादित करण्यात येणार आहे.(Chikhali) त्या जागेत चिखली पोलीस ठाण्याचे स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 23 लाख 95 हजार 250 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. तेव्हापासून हे पोलीस ठाणे भाडेतत्तवारील इमारतीत सुरू आहे. पोलीस ठाण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पूर्णानगर येथील चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्रात नऊ गुंठे जागा आरक्षित करण्यात आली होती.

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात बत्ती गुल

तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रातील या जागेच्या संपादनासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करण्यात आला आहे.(Chikhali) राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आकारणी करून 25 टक्के सवलतीच्या दरानुसार 23 लाख 95 हजार 250 रुपये अधिमूल्यापोटी जमा करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम, त्याचा खर्च याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याला मंजुरी घेऊन लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.