Nigdi : आयुक्त शेखर सिंह यांची दुर्गा टेकडी उद्यानाला ‘सरप्राईज व्हिजीट’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचपड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह (Nigdi) यांनी आज (बुधवारी) सकाळी निगडीतील दुर्गादेवी टेकडी उद्यानाला अचानक भेट दिली. दुर्गादेवी टेकडी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांबरोबर शहरातील पर्यावरण, नागरी सुविधा अशा विविध विषयांवर संवाद साधला. नागरिकांनी आयुक्तांसमोर विविध समस्या मांडून त्यावर चर्चा केली.

उद्यान विभागप्रमुख रविकिरण घोडके यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दुर्गादेवी टेकडी येथे येणाऱ्या नागरिकांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. त्यामध्ये दुर्गादेवी उद्यानाची सद्यस्थिती, पाणीपुरवठा, रंगरंगोटी, ओपन जिम इत्यादी बाबींसंदर्भात सूचना करण्यात आल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था, सौरऊर्जा, शहर स्वच्छता व नागरिक सहभाग अशा विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. तसेच, प्रत्यक्ष पाहणी करून अधिका-यांना सूचना केल्या.

प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. नागरिकांनी आयुक्तांना या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या मोहिमेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांना भेटण्याची संधी मिळून त्यांच्यापुढे विविध प्रश्न मांडता आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात देखील महापालिकेच्या प्रकल्पांना अशाच प्रकारे भेटी (Nigdi) देण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Pune : महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘मिंग्लिश मिडीयम’ने सांगितले मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व

उद्यानांचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण करण्यावर महापालिका भर देत आहे. सकाळी मॉर्निग वॉक आणि स्वच्छ हवा मिळावी, यासाठी शहरातील उद्यानांमध्ये येणा-या नागरिकांसाठी महापालिकेमार्फत नागरी सोयीसुविधा उभारून चांगली सेवा देण्यात येईल, असे आयुक्त सिंह यांनी नागरिकांना आश्वासित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.