Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात बत्ती गुल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) विविध भागात बुधवारी (दि. 26) पुरवठा खंडित झाला. दरम्यान याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता कुणालाही वीजपुरवठा खंडित झाल्याचे नेमके कारण सांगता आले नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्योतिबा नगर तळवडे, चिंचवड स्टेशन, खराळवाडी पिंपरी तसेच अन्य भागातील वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला. याबाबत महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, महावितरण कडून दुरुस्तीची कामे गुरुवारी केले जातात अन्य दिवशी महापालिकेच्या उद्यान विभागाशी निगडीत मोठ्या वृक्षांच्या फांद्या कट करणे आणि अन्य कामे केली जातात. मात्र बुधवारी वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत नेमकी माहिती सांगता येणार नाही.”

Arogyavardhini : आरोग्यवर्धिनी भाग एक – थेरगाव रुग्णालय सर्वसामान्यांसाठी ठरतंय आधारवड!

ज्योतिबा नगर तळवडे या परिसरात रहिवासी वसाहतीसह कंपन्या देखील आहेत. चिंचवड स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने आणि कार्यालय आहेत. (Pimpri) तर खराळवाडी परिसरात रहिवासी वसाहती आणि कार्यालये आहेत. बुधवारी विजापुरवठा खंडित झाल्याने अनेकांची कामे खोळंबली. त्यातच उन्हाळा असल्याने उकाड्याने अंगाची लाही लाही झाली.

एक फिडर बंद आहे. त्याचे काम सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी अथक काम करत असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भोसरी महावितरणकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.