Dehuroad News: वाहनचालकांकडून पैसे वसूल करणाऱ्या तोतया वाहतूक पोलिसावर कारवाई करा – श्रीजित रमेशन

एमपीसी न्यूज – उर्से टोलनाक्यावर एका वाहतूक पोलिसाच्या आशीर्वादाने वाहतूक पोलिसांचा गणवेश परिधान करुन वाहतूकदार आणि प्रवाशांकडून अवैधपणे पैसे वसूल करणा-या तोतयावर कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे.

याबाबत देहूरोड वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात रमेशन यांनी म्हटले आहे की, वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी उर्से एक्स्प्रेस-वेवरील टोल नाक्यावर सुमित मोहरीर याला वाहतूक पोलीस असल्याचे भासवत तैनात केले होते. ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश घातलेला सुमित मोहरीर हा वाहतूक पोलीस असल्याचा आव आणत मोहन पाटील यांच्यासह वाहतूकदार आणि प्रवाशांकडून अवैधपणे पैसे वसूल करत असे.

खराबवाडी येथे अढळला तरूणीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह

या दोघांविरुद्ध पुरावे गोळा केल्यानंतर मी देहूरोड वाहतूक पोलीस विभागात लेखी तक्रार केली. देहूरोड वाहतूक पोलीस विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे रमेशन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.