Talavade : गाळ्याला कुलूप लावले म्हणून भावांकडून बहिणीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज-  आईने तिच्या मालकीच्या गाळ्याला कुलूप लावले याचा राग तीन भावांनी थेट बहिणीवर काढला आहे. या घटनेत बहिणीला लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पट्टीने मारहाण करण्यात आली आहे . ही घटना शनिवारी दुपारी तळवडे येथे घडली आहे.
याप्रकरणी पीडित बहिणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादीवरून पोलिसांनी पीडीतीचे भाऊ हबीब हाफिजूर शेख,करीम हाफीजुर शेख व हसीब हाफिजूर शेख  ( सर्व रा . तडवळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या आईने त्यांच्या मालकीच्या गाळ्याला कुलूप लावले होते. गाळ्याला कुलूप का लावले याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

तर लोखंडी पट्टी व पीव्हीसी पाईप यांनी पाठीवर पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून, पोलीस तपास करत (Talavade) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.