Talavade Crime News : कल्याण मटका जुगार चालवणा-यास अटक

एमपीसी न्यूज – कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून आठ हजार 470 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी तळवडे येथे शनिवारी (दि. 4) दुपारी केली.

दिलीप कुमार चिमनदास जसवाणी (वय 56, रा. महाळुंगे कमानीजवळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार कोंडीबा वाव्हळे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप हा तळवडे येथील एका कंपनीसमोर कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत दिलीप याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.